Breking News
Pune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्नTribal Community and Environment Conservation : जनजातीय गौरव दिवस विशेष लेखPune Police Crime News : सराईत गणेश लोंढेवर एमपीडीएचा बडगाMSEDCL Pune Chief Engineer : महावितरण पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी पंकज तगलपल्लेवार रुजूDagdusheth Ganpati Temple Pune : श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला ११०० नारळांचा महानैवेद्यPune ACB Bribery Case : फेरफार नोंदींसाठी २० हजारांची लाच मागितलीPune Cat Theft Case : पर्शियन मांजरीची चोरी करून विक्री; ५ जणांवर गुन्हा दाखलPune Online Fraud News : ‘टॉनिक’च्या नावाने गुगलवर बनावट वेबसाइट

पूर्वसूचना न देता झोपड्या तोडल्याने झोपडपट्टी सुरक्षा दलाचा संतप्त मोर्चा

पूर्वसूचना न देता झोपड्या तोडल्याने झोपडपट्टी सुरक्षा दलाचा संतप्त मोर्चा

झोपडपट्टी सुरक्षा दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा

marathinews24.com

पुणे – खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता वडगाव धायरी येथील जवळपास ८० झोपड्या बेकायदेशीरपणे पाडल्याने आठशे नागरिक बेघर झाले या निषेधार्थ झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने जोरदार आणि बेधडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर येथून निघून पुणे, महानगरपालिका, सिंचन भवन व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -२०२६ – सविस्तर बातमी 

या मोर्चाचे नेतृत्व भगवानराव वैराट यांनी केले. या मोर्चामध्ये काशिनाथ गायकवाड, मोहम्मद शेख, दत्ता कांबळे, सुरेखा भालेराव, वैशाली अवघडे, वंदना पवार, गणेश लांडगे, संतोष कदम, नाना थोरात, सुनीता आडसुळ, अरुणा तांगडे, श्रीनिवास आखाडे, तुषार मोरे, आबा चव्हाण, संतोष बोचालजी, संतोष रणदिवे, यांच्यासह सुमारे ७०० ते ८०० स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

महाराष्ट्र झोपडपट्टी धारकांसाठी लागू असलेल्या महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन कायदा २०१५ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत कोणतीही पूर्वसूचना न देता दलितांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कलम ३ व ४ नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तसेच शासकीय गायरानवरील झोपड्या औरंगाबाद  खंडपीठाच्या आदेशावरून निर्णयाची अंमलबजावणी करा अशी मागणी करण्यात आली.

याच मोर्चात डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत फर्ग्युसन महाविद्यालयात गेली दहा वर्षे काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन, वैद्यकीय सुविधा, पीएफ, ग्रॅज्युएटी आदी लाभ नाकारण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. किमान वेतन अधिनियम १९४८, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ व कंत्राट कामगार कायदा १९७० चे उल्लंघन झाल्याने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून टाळा यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.

या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राऊत यांच्याशी बैठक घेण्यात आली. दोन्ही बाजूंमध्ये सकारात्मक चर्चा होऊन लेखी करारनामा करून कर्मचाऱ्यांना योग्य लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले. पुणे आयुक्त नवल किशोर राम, सहाय्यक मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग शिवाजी जाधव, उपजिल्हा अधिकरी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×