Breking News
केंद्रीय राज्य मंत्र्याची अशीही संवेदनशीलता…बस प्रवासादरम्यान चोऱ्या करणाऱ्या दोन महिलांना अटकतब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परतउपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-३ या पुस्तकाचे प्रकाशनराज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटनशेतजमिनीशी निगडित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमुद्रांक शुल्क अभय योजनेस मुदतवाढीबाबत प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभहवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडादिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

लघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजन

लघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजन

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे –  जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणींबाबत, फंडिंगचे विविध प्रकार, लोन प्रपोजल, लोन प्रक्रिया यांची माहिती, आपला व्यवसाय कसा उभारावा आणि त्याची ओळख कशी निर्माण करावी, आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी सुधारायची याबाबत प्रोत्साहनकरिता १३ जून २०२५ रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

प्रशिक्षण कार्यक्रम भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन कॉलेज ऑफ आर्टस सायन्स अॅड कॉमर्स कॉलेज, शिवाजीनगर पुणे येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील विविध क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योजक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त लघुउद्योजक यांनी सहभागी व्हावे व आपल्या सहभागाबाबतची नोंदणी https://forms.gie/1mTU5sJnruXWxPhz8 या लिंकवर करुन लघुउद्योजक यांनी प्रशिक्षणाचा लाभघ्यावा असे आवाहन सा. वा. मोहिते, प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दुरध्वनी क्रमांकावार संपर्क करावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top