Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गांजा विक्री प्रकरणात उत्तर प्रदेशातील तस्करांना अटक

गांजा विक्री प्रकरणात उत्तर प्रदेशातील तस्करांना अटक

३ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – गांजा विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तस्करांना बाणेर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन किलाे गांजा जप्त करण्यात आला. रवी विजय वर्मा (वय १९), कौशलेंद्र नथूराम वर्मा (वय २३, दोघे सध्या रा. शिव काॅलनी, पिंपळे सौदागर, मूळ रा. भरतकुंभ, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वर्मा बाणेर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून तीन किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न, ५ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

आरोपींनी गांजा कोठून आणला, तसेच ते कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होते, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक डाबेराव, नंदकुमार कदम, अनिल माने, उपनिरीक्षक संदेश माने, शैला पाथरे, सहायक फौजदार सपकाळ, गायकवाड, शिंगे, इंगळे, गाडेकर, खरात, राऊत, भोरे, काळे यांनी ही कामगिरी केली.

गुरुवार पेठेत मेफेड्रोन बाळगणारा गजाआड

गुरुवार पेठेतील जैन मंदिर चौकात मेफेड्रोन बाळगणाऱ्याला खडक पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून २ लाख २५ हजार रुपयांचे ४५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सुदीपकुमार राजेशकुमार कनोजिया (वय २२, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जैन मंदिर चौकात कनोजिया मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची महिती पोलीस कर्मचारी चव्हाण यांना मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी सापळा लावून कनोजियाला पकडले. त्याच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याने मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच तो कोणाला विक्री करणार होता यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×