Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

‘आरएमसी’ साठी तीन आठवड्यांत एसओपी; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोर झोन’ निश्चित करणार

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांबाबत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शहरातील प्रदूषणात आरएमसी प्लॅन्ट्सचा काही प्रमाणात वाटा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत आरएमसी उद्योगासाठी येत्या तीन आठवड्यांत मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील चार ते सहा महिन्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रासाठी प्रदूषणमुक्त ‘कोर झोन’ निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

या बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम , पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी , दोन्ही महानगर वरिष्ठ पोलिस अधिकारी,वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच पुणे जिल्हा रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लॅन्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, महानगरातील वाढते वायुप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने समन्वयात्मक पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमआरडीए, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त बैठकीत आरएमसी उद्योगासाठी सविस्तर एसओपी निश्चित करण्यात येईल. तोपर्यंत अधिकृत आणि नियमांचे पालन करणारे आरएमसी प्रकल्प अटी व शर्तींसह सुरू राहतील; मात्र अनधिकृत प्लॅन्ट्सवर कठोर कारवाई करून ते बंद करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दोन्ही महानगरातील ‘रेड झोन’ क्षेत्र वगळता बुधवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये आरएमसी वाहतुकीला पूर्ण मुभा देण्यात आली आहे. उर्वरित चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच आरएमसी वाहतुकीस परवानगी असेल. ही तात्पुरती व्यवस्था एसओपी अंतिम होईपर्यंत लागू राहणार आहे.
*बैठकीतील महत्त्वाचे चार निर्णय पुढीलप्रमाणे* :
१) पुढील चार ते सहा महिन्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रासाठी प्रदूषणमुक्त ‘कोर झोन’ निश्चित करण्यात येणार.
२) पीएमआरडीए, दोन्ही महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त बैठकीत येत्या तीन आठवड्यांत आरएमसी उद्योगासाठी एसओपी तयार करण्यात येणार.
३) दोन्ही महानगरातील रेड झोन क्षेत्र वगळता बुधवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवस आरएमसी वाहतुकीला मुभा; उर्वरित चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच वाहतुकीस परवानगी.
४) आरएमसी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्पष्ट नेमप्लेट लावणे, वाहनांमध्ये कॅमेरे बसविणे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार.

प्रशासनाने उद्योग आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखत शहरातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. पुणे महानगर क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरएमसी उद्योगासाठी स्वतंत्र नियमन प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×