Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ विषयावर विशेष मुलाखत प्रसारित

जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप देणार योजनेची सविस्तर माहिती; शेतकऱ्यांच्या शंकांचे होणार निरसन

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ या विषयावर आधारित विशेष मुलाखतीचे प्रसारण शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.१० ते १०.२५ या वेळेत आकाशवाणी पुणे ‘अ’ केंद्रावर होणार आहे.

पुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळख; ‘नागरिक सोशल फाउंडेशन’तर्फे ‘आदर्श मंदिर स्पर्धा २०२६’चे आयोजन – सविस्तर बातमी

या विशेष मुलाखतीत सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश लक्ष्मण जगताप हे योजनेची उद्दिष्टे, पात्रता, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे विविध टप्पे तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

मुलाखतीचे सूत्रसंचालन व प्रश्नोत्तरांचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटीलयांनी केले आहे. संवादात्मक स्वरूपातील या कार्यक्रमातून शेतकरी, सहकारी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील विविध शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शेतकरी बांधवांनी या योजनेची अधिकृत, अचूक आणि विश्वासार्ह माहिती जाणून घेण्यासाठी शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.१० वाजता ते १०.२५ वाजता या वेळेत आकाशवाणी पुणे ‘अ’ केंद्रावरील हा विशेष कार्यक्रम आवर्जून ऐकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×