Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

५ कोटी ६ लाख रुपये वेतनाचा अपहार

marathinews24.com

पुणे – सिंहगड एज्युकेशन सोसासयटीतील २७ शिक्षकांच्या वेतनाचा अपहार केल्या प्रकरणी संस्थापक मारुती नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका शिक्षिकेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपहार करणे, तसेच फसवणूक केल्या प्रकरणी सिंहगड एज्युकेशन संस्थेचे मारुती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचन नवले- अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले, लेखा विभागाचे संजय मोरे, शरद जराड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षिकेने फिर्याद दिली आहे.

अडीच कोटींचे सोने घेऊन कारागिर पसार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिक्षिका या सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. एप्रिल २०२० पासून सिंहगड संस्थेने त्यांचे वेतन अदा केले नव्हते. गेल्या साडेपाच वर्षात तक्रारदार शिक्षिकेचे १९ लाख ३६ हजार रुपयांचे वेतन थकीत होते. तक्रारदार शिक्षिकेसह २७ जणांचे वेतन थकीत होते. वेतन मिळवण्यासाठी त्यांनी पाठपुराव केला. मात्र, त्यांना वेतन दिले नाही. फसवणूक, तसेच अपहार केल्या प्रकरणी शिक्षकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात मारुती नवले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×