Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

फुले वाडा विस्तारीकरणासाठी भुसंपादन गतीने करा – मंत्री छगन भुजबळ

महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारीकरणाकरिता भुसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

marathinews24.com

पुणे – ‘महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरण’ म्हणून आरक्षित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तारीकरणाकरिता आरक्षित क्षेत्राच्या भुसंपादनाचे काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निर्देश दिले.

सीबीआय अधिकारी असल्याची केली बतावणी सीबीआय अधिकारी असल्याची केली बतावणी; लग्नाची मागणी घातली अन् ८ लाखांची फसवणूक केली – सविस्तर बातमी

भिडेवाडा, महात्मा फुलेवाडा येथे भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाबाबत माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, उपायुक्त अविनाश संकपाळ, सहायक आयुक्त किसन दगडखैर, भूसंपादन उपायुक्त वसुंधरा बारवे, अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, अधिक्षक अभियंता राजेश बनकर आदी उपस्थित होते.

फुले वाडा विस्तारीकरणासाठी भुसंपादन गतीने करा - मंत्री छगन भुजबळ

भुजबळ म्हणाले, महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राचे पुणे महानगरपालिकेच्यावतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले आहे. स्मारकांचे कामे करतांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केलेल्या सूचनाचा विचार करावा, असेही भुजबळ म्हणाले.

प्रारंभी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची पाहणी तसेच याठिकाणी बसविण्यात येणाऱ्या खिडक्यांबाबत माहिती घेवून स्मारकाची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या भुजबळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

चंद्रन म्हणाले, महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणाकरिता महानगरपालिकेने स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राअंतर्गत 119 घरांक (सिटी सर्वे क्रमांक), 624 मालक, 358 भाडेकरु, गलिच्छ वस्ती निर्मूलनाअंतर्गत 36 गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, भुसंपादनाच्या कामे गतीने पूर्ण करण्यात येईल, असेही चंद्रन म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×