जांभुळवाडीतील घटना
marathinews24.com
पुणे – टेम्पो चालकाने वेगाने गाडी चालवित रस्त्यानजीक खेळणार्या ३ वर्षीय मुलाला जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ८ मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास जांभुळवाडीतील कोळेवाडी रस्त्यावरील शिवाज्ञा बंगल्यासमोर घडला आहे. बेदरकापणे वाहन चालविल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील महत्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढविली – सविस्तर बातमी
अलताब नवशाद सलमानी (वय ३ रा. कोळेवाडी रोड, जांभुळवाडी, हवेली ) असे ठार झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी इरशाद सलमानी (वय २२) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाविरूद्ध मोटार वाहन कायदा कलमनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानी कुटूंबीय जांभुळवाडीतील कोळेवाडी रस्ता परिसरात राहायला आहे. ८ मे ला दुपारी बाराच्या सुमारास अलताब हा तीन वर्षीय मुलगा रस्त्यालगत खेळत होता. त्यावेळी पाठीमागून वेगाने टेम्पो आल्याचे मुलाने पाहिले नाही. अचानकपणे मुलगा रस्त्यावर आल्यामुळे टेम्पो चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे अलताब हा गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम.जी. वाघमारे तपास करीत आहेत.
कर्वे रोडवर दुचाकीस्वाराने पादचारी जेष्ठाला उडविले
पुणे – दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे रस्ता ओलांडत असलेल्या ७० वर्षीय जेष्ठाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ८ मे रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील आशा हॉटेलसमोर घडला आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चालकाविरूद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग पोपटराव लांडे (वय ७० रा. कोथरूड) असे ठार झालेल्या पादचार्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आशिष लांडे वय ३८ यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करीत आहेत.