Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

ग्लोबल एज्युकेशन फेअरला पुण्यातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टडी स्मार्टच्या मोफत मार्गदर्शनाचा ९०० हून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला लाभ

marathinews24.com

पुणे – परदेश शिक्षण सल्लागार संस्था स्टडी स्मार्ट तर्फे ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२५’ चे आयोजन बोट क्लब, पुणे येथे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हा कार्यक्रम एकाच छताखाली संपूर्ण मार्गदर्शन देणारा ठरला, या ग्लोबल एज्युकेशन फेअरला पुण्यातील विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, दिवसभरात ९०० हून अधिक विद्यार्थी, पालकांनी मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती स्टडी स्मार्टचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन यांनी दिली.

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

चेतन जैन म्हणाले, बारावी किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर हजारो विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगतात; मात्र योग्य विद्यापीठाची निवड, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, आर्थिक नियोजन आणि राहण्याची सोय याबाबत अनेकांना संभ्रम असतो. ग्लोबल एज्युकेशन फेअर या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष रचण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना यूके, यूएसए, आयर्लंड, जर्मनी, दुबईसह विविध देशांतील ६० हून अधिक नामांकित विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधता आला.

फेअरमध्ये शिष्यवृत्ती, आर्थिक मदत योजना, जानेवारी व सप्टेंबर २०२६ प्रवेश संधी, स्पॉट ऑफर्स, IELTS वेव्हर्स, तसेच परदेशात शिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन करणाऱ्या इंटरॅक्टिव्ह वर्कशॉप्स आयोजित करण्यात आले होते, यामध्ये स्टडी स्मार्टचे तज्ज्ञ काउन्सेलर्सनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना संपूर्ण मोफत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, परदेशातील निवासव्यवस्था, फॉरेक्स व प्रवास सहाय्य यांसाठी स्वतंत्र डेस्क्स देखील ठेवण्यात आले होते, असेही जैन यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×