Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

खादीच्या स्वदेशी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

खादीच्या स्वदेशी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘स्वदेशी महोत्सव’ प्रदर्शनाचे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – ग्रामीण भागातील कारागीर, उद्योजक आणि महिला स्वयंसहायता गटांना व्यासपीठ मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुना गोअन इन्स्टिट्यूट, नाना पेठ येथे आयोजित ‘स्वदेशी महोत्सव’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, लेखा परीक्षण अधिकारी शैलेंद्र कोलथरकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे, मंडळाचे लेखापाल अमर राऊत, विविध ग्रामोद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हरनाम सिंह ते शेखर सिंह पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी ‘‘एक पाऊल पुढे’’ – सविस्तर बातमी

सभापती साठे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचे केलेले आवाहन लक्षात घेऊन महामंडळामार्फत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविणे हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी मंडळाची उद्दिष्टे आणि कार्ये याबद्दल माहिती दिली. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे मुंबई व पुणे येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वदेशी महोत्सव’ १४ ऑक्टोबरपर्यंत; खरेदीचे पुणेकरांना आवाहन

प्रदर्शनात खादीचे कुर्ते, साड्या, पारंपरिक कपडे, मध, मसाले, पापड, लोणचे, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, दिवाळी फराळ, कंदील, सेंद्रीय साबण, तेल, वनौषधी, तसेच लोकरीपासून तयार झालेल्या घोंगड्या अशा विविध स्वदेशी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुणेकर नागरिकांकडून या वस्तूंना मोठा प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठ मिळत आहे. हा स्वदेशी महोत्सव १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्वदेशी वस्तूंच्या खरेदीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×