हर घर तिरंगा अभियात लोणावळा शहरात देशभक्तीपर उपक्रमाचे आयोजन
marathinews24.com
पुणे – लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने हर घर तिरंगा अभियानास शहरात देशभक्ती जनजागृतीपर उपक्रमात 16 हजार 61 नागरिकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली.
आयएनएस शिवाजी नेव्हल बँड पथक व लोणावळा नगरपरिषद यांच्या सहकार्याने शहरातील विविध शाळेत देशभक्तीपर संगीतवाद्य कार्यक्रम व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी देशभक्तीपर मार्गदर्शन शिबराचे आयोजित करण्यात आले. यामध्ये नौदल सैनिक, नागरिक, विद्यार्थी असे एकूण 5 हजार 746 सहभागी झाले. मीरा बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्यावतीने तिरंगा राखी कार्यशाळा आयोजित करुन यामध्ये तयार करण्यात आलेल्या राख्या भारतीय सैनिकांना सुपूर्द करण्यात आल्या.
पॅरा एडिशनमध्ये मनीष नरवालची सुवर्ण कामगिरी..! – सविस्तर बातमी
लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने पर्यटन स्थळावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता आयोजित आरोग्य शिबीरात नेत्र तपासणी व महिला कर्मचारी यांची स्तनपान तपासणी, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. एकूण 1 हजार 140 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
शहरात हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम, सफाई कर्मचारी यांचा सन्मान सोहळा, शाळा स्तरावर चित्रकला, रांगोळी, तिरंगा राखी बनविणे, प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत यांच्या मार्फत तिरंगा राखी बनविणे उपक्रम राबविण्यात आले. विविध 17 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 7 हजार 419 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, याकरिता सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता लागणारे आवश्यक साहित्य पुरविण्यात आले, अशी माहिती साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
“हर घर तिरंगा, घर घर तिरंगा”अभियानाअंतर्गत मंचरमध्ये विविध उपक्रम संपन्न
पुणे – मंचर नगरपंचायतीच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राबविण्यात आलेले विविध देशभक्तीपर व जनजागृतीचे उपक्रम उत्साहात पार पडले असून शहरातील 3 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतल्याची असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
पंचवटी उद्यानामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यामध्ये महिला बचत गट, कर्मचारी,अधिकारी तसेच स्थानिक नागरिक असे एकूण 150 नागरिकांनी सहभाग नोंदविला. महात्मा गांधी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये तिरंगा राखी निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 300 विद्यार्थ्यांना अभियानाबाबत माहिती देण्यासह देशभक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
नगरपंचायत व संत ज्ञानेश्वर सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली तसेच हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद शाळा मोरडेवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता मोहिमेअंतर्गत शपथ देण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी तसेच नागरिक असे एकूण 750 जणांनी सहभाग घेतला.
नगरपंचायत कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.तसेच अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी ग्रुपने शपथ घेऊन ध्वजारोहण करून 15 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थी, शिक्षक, नगरपंचायत कर्मचारी, अधिकारी तसेच नागरिक असे एकूण 850 सहभाग घेतला.
हर घर तिरंगा-2025″ आणि “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता”अभियानांतर्गत मंचर शहरात घेतलेले हे विविध उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले आहेत, अशी माहिती जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
तळेगाव दाभाडे येथे हर घर तिरंगा अभियान; उपक्रमास 6 हजाराहून अधिक नागरिकांचा सहभाग
‘हर घर तिरंगा अभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने शहरामध्ये आयोजित विविध उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये सुमारे 6 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये विविध ठिकाणी घरोघरी जाऊन ‘हर घर तिरंगा’ हर घर स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना परिसर स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाविषयी माहिती देण्यात आली. या उपक्रमात 300 नागरिकांनी व 50 बचत गट महिलांनी सहभाग घेतला.
थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र.1 येथे विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी माहिती देण्यासह परिसर स्वच्छता करण्यात आली. सरस्वती विद्या मंदिर येथे सीमेवरील जावानंकरिता विद्यार्थ्यांमार्फत राखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.तसेच शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.
नगरपरिषदेमार्फत कॅनव्हास पेंटिंग आणि स्लोगन स्पर्धाही आयोजित करण्यात आली. थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र. 2 येथे राखी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेमध्ये 400 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि रोटरी कालब ऑफ तळेगाव दाभाडे आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रा सिटी रोड ते मारुती मंदिर चौक यादरम्यान प्रभात फेरी काढण्यात आली.
हर घर तिरंगा-2025″ आणि “हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता” अभियानांतर्गत शहरात घेण्यात आलेले उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
‘हर घर तिरंगा’ अभियानास वडगाव येथे उर्त्स्फूत प्रतिसाद; वडगाव शहरातील 4 हजार 400 नागरिकांचा सहभाग
बारामती – ‘हर घर तिरंगा’ अभियानात वडगाव नगरपंचायतीच्यावतीने आयोजित विविध देशभक्तीपर, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व आदी जनजागृतीपर उपक्रमास उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला असून शहरातील 4 हजार 400 नागरिकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांनी दिली.
न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथे 1 हजार 450 विद्यार्थ्यांनी स्वच्छता शपथ व तिरंगा शपथ घेतली. न्यू इंग्लिश स्कूल, रमेश कुमार सहानी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सर्व जिल्हा परिषद शाळेच्यावतीने नागरिकांना अभियानात सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात करण्यात आले. पर्यावरण पूरक तिरंगा राखी स्पर्धा, तिरंगा रांगोळी व चित्रकला स्पर्धा, तिरंगा प्रश्नमंजुषा, तिरंगा दौड, पथनाट्य, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, भारतीय जवानांच्या साठी पत्र लेखन, तिरंगा सेल्फी आदी उपक्रम राबविण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल रयत शिक्षण संस्थेच्या पर्यावरण पूरक राखी स्पर्धेत सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
नगरपंचायत कार्यालय येथील तिरंगा सेल्फी पाँईटवर सुमारे 150 नागरिक व कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेतला. सर्व शाळा व महाविद्यालयाने 500 तिरंगा झेंडे वाटप केले. जिल्हा परिषद शाळा केशवनगर, न्यू इंग्लिश स्कूल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचा प्रवासाबाबतचा लघु चित्रपट दाखवून यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुमारे 1 हजार 800 विद्यार्थी, न्यू इंग्लिश ₹ स्कूल येथे तिरंगा चित्रकला स्पर्धेमध्ये सुमारे 250 विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा केशवनगर येथे तिरंगा राखी निर्मिती स्पर्धेमध्ये सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती शाळेच्यावतीने आयोजित तिरंगा प्रभात फेरीमध्ये सुमारे 250 विद्यार्थी सहभागी झाले. शहरातील नागरिकांना राष्ट्रध्वज मोफत वाटप करुन नागरिकांमध्ये तिरंगा ध्वज फडकवणे व अभियानाची जनजागृती करण्यात आली. शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन व एलईडीस्क्रीनद्वारे हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली. येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे व शहरात पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ निकम यांनी दिली आहे.























