Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

विविध मागण्यांसाठी स्टेशन मास्टरांचे आंदोलन

संबंधित पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात घेतला उत्स्फूर्त सहभाग

marathinews24.com

पुणे – विविध मागण्यांसाठी स्टेशन मास्टरांचे आंदोलन – ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन (AISMA) पुणे मंडळाच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन करण्यात आले. पुणे रेल्वे मंडळातील शेकडो स्टेशन मास्टर्स, सहाय्यक कर्मचारी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आंदोलनानंतर मंडळ रेल्वे व्यवस्थापकांना १९ प्रमुख मागण्यांचे सविस्तर स्मरणपत्र देण्यात आले. या आंदोलनात AISMA माजी राष्ट्रीय महामंत्री धनंजय चंद्रात्रय, मंडल सचिव पुरुषुत्तम सिंग, मंडल अध्यक्ष कृष्ण मुरारी, तसेच स्टेशन मास्टर अजय सिन्हा, अमित कुमार, गंगाधर शाहू, अर्जुन कुमार, शकील इनामदार, दिनेश कांबळे, गोपाल कुमार यांसह पुणे मंडळातील एकूण १३० स्टेशन मास्टर्स उपस्थित होते.

भाजप काँग्रेसयुक्त झाला; नेतृत्व व कार्यकर्त्यांचा अभाव-कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ – सविस्तर बातमी 

या मागण्यांमध्ये स्टेशन मास्टर्सच्या कार्यकक्षात वातानुकूलन (AC) आणि आरामदायी फर्निचरची सोय, सर्व स्टेशनवर शुद्ध पिण्याचे पाणी, रिक्त पदांची तातडीने भरती, संवेदनशील स्टेशनवर दुसऱ्या स्टेशन मास्टरची नेमणूक, महिलांसाठी स्वतंत्र बदलण्याची खोली व शौचालय, योग्य ड्युटी रोस्टर, पदोन्नती व बदली धोरणातील सुधारणा, तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक तांत्रिक बदलांचा समावेश आहे.

संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, उष्णतेमुळे आणि उपकरणांच्या उष्णतेमुळे अनेक स्टेशन मास्टर्सना आरोग्य समस्या भेडसावत आहेत. योग्य खुर्च्या नसल्याने पाठीच्या व मानेच्या तक्रारी वाढल्या असून, याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यक्षमता व एकूणच रेल्वेच्या सुरक्षिततेवर होत आहे. रिक्त पदांमुळे ड्युटीचे ओझे असह्य झाले आहे, तसेच अनेकांना आठवड्याचा निश्चित सुट्टीचा दिवस मिळत नाही. महिलांना कार्यकाळात सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध नसल्याची खंतही नेत्यांनी व्यक्त केली.

तांत्रिक बाबींच्या संदर्भात, डाटा लॉगर सिस्टीममधील विलंब दूर करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर बदल, तसेच स्टेशन मास्टर्सना वेळेवर ओव्हरटाईम भत्ता देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, स्थानकांच्या समोर पावसापासून व उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारणे, स्टेशन परिसरातील सुरक्षाविषयक प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळणे, आणि इतर विभागांकडून होणाऱ्या अनधिकृत हस्तक्षेपावर मर्यादा आणणे यांसारख्या मुद्द्यांनाही महत्त्व देण्यात आले.

संघटनेने सांगितले की, या सर्व मागण्या तातडीने पूर्ण झाल्यास कर्मचारी मनोबल वाढेल, रेल्वे सेवा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होईल, तसेच प्रवासी सेवांची गुणवत्ता सुधरेल. त्यांनी इशारा दिला की, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. हे आंदोलन पुणे मंडळातील स्टेशन मास्टर्सच्या एकतेचे प्रतीक ठरले. अनेक स्टेशनवरून आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या समस्या उघडपणे मांडल्या. संघटनेच्या बॅनरखाली झालेल्या या लढ्यात, सर्व मागण्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी घोषणाबाजी व शांततापूर्ण मार्गाने निदर्शन करण्यात आले. रेल्वे व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×