Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

“कुंकवातील भेसळ थांबवा; त्वचेसाठी घातक”

कल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे कारवाईची मागणी

marathinews24.com

मुंबई – राज्यभरात विक्री होणाऱ्या कुंकवामध्ये रसायनांची व रंगांची भेसळ होत असल्याने महिलांच्या त्वचेस धोका निर्माण झाला आहे, असे निदर्शनास आणत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्याकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

पुणे शहरात चोरट्यांचा उच्छाद.. मोबाईल, दागिने, ऐवजांची चोरी सुरुच – सविस्तर बातमी

दैनिक ‘लोकमत’च्या २४ जूनच्या अंकात प्रकाशित झालेल्या बातमीचा संदर्भ देत त्यांनी कुंकवामध्ये असलेल्या घातक पदार्थांमुळे त्वचेवर खाज, ॲलर्जी, डाग आणि काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्राद्वारे राज्यभरातील कुंकू उत्पादक आणि विक्रेत्यांकडून नमुने संकलित करून त्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली असून, भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असे स्पष्ट केले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनाही यासंदर्भातील प्रत पाठवून यंत्रणेला सजग राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विषयाकडे शासन गांभीर्याने पाहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×