Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या अवमानाविरुद्ध तीव्र निषेध मोर्चा

उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या अवमानाविरुद्ध तीव्र निषेध मोर्चा

पिंपरी- चिंचवड शहरात आंबेडकरी जनतेचा आक्रोश

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी- चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा केला. या मोर्चात संख्येने आंबेडकरी कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित नागरिक सहभागी झाले होते. या निषेध मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभेने सांगता झाली.

मनपा आयुक्तांवर सात दिवसांत कारवाईचा इशारा

निषेध सभेत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकमुखाने आयुक्तांवर सात दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला “टाळा ठोको ” आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत होते. यावेळी रिपब्लिकन चळवळीचे नेते सुरेश निकाळजे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे, दलित पॅंथरचे दीपक केदारी, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, संतोष निसर्गंध, धर्मपाल तंत्रपाळे, कुणाल वावळकर, अजिजभाई शेख, बाळासाहेब रोकडे, विजय डोळस, संदिपान झोंबाडे, ज्ञानेश्वर कांबळे, गंगा धेंडे, सुप्रिया काटे, सिकंदर सूर्यवंशी, अंजना गायकवाड यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बनसोडे कुटुंबियां कडून आभार

बनसोडे कुटुंबियांच्या वतीने सिद्धार्थ बनसोडे यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून मोर्चात सहभागी समाज बांधवांचे आभार मानले. “आंबेडकरी जनतेने अण्णांसाठी दाखवलेले प्रेम आणि समर्थन आम्ही कधीही विसरणार नाही. जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू,” अशा भावनिक शब्दांमधून मोर्चातील सहभागी बांधवांचे आभार व्यक्त केले.

कायदेशीर कारवाईसाठी तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय अवसरमल यांनी याप्रकरणी पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईसाठी पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त श्री. आटोळे, पोलीस आयुक्त श्री. हिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ तसेच श्री. कडलक यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले.

आंबेडकरी चळवळीचा भावनिक आणि कायदेशीर लढा

आज झालेला निषेध मोर्चा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी भावनिक आणि कायदेशीर पद्धतीने आयोजित केला होता. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षांच्या प्रकरणाच्या निमित्ताने समाजातील अन्याय आणि अपमानाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा संदेश या मोर्चाने दिला. आंबेडकरी विचारधारा आणि तत्त्वांवर आधारित हा लढा पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×