Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

प्रेम संबंधातून तरुण-अल्पवयीन मुलीची आत्महत्या

खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात आढळले मृतदेह

marathinews24.com

पुणे – प्रेम संबंधातून तरुण-अल्पवयीन मुलीची आत्महत्या –  प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात घडली आहे. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने गुरूवारी (दि. १०) वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पुणे इसिस मोड्यूल प्रकरणातील आणखी एका दहशतवाद्याला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी फिर्यादी यांनी त्यांच्या १६ वर्षीय बहिणीला कोचिंग क्लास साठी सोडले होते. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात इसमाने बहिणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी, एका संशयित मुलाचा देखील तपास करायला सुरुवात केली. तो मुलगा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. शुक्रवारी (दि. ११) खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात दोघांचे (एक मुलगा आणि एक मुलगी) मृतदेह आढळून आल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

विष प्राशन करून संपवले आयुष्य

खडकवासला परिसरातील जंगलात विष प्राशन करून दोघांनी आत्महत्या केली. ज्या ठिकाणी आत्महत्या केली. त्याठिकाणी पोलिसांना कुठलीही सुसाइड नोट मिळाली नाही. विषारी औषधाची बाटली घटनास्थळी पोलिसांना सापडली. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×