Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात जनजागृतीपर उपक्रम

‘मौन तोडा, संवाद सुरू करा, ऐका, साथ द्या, मदतीशी जोडा’; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

marathinews24.com

बारामती – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती येथील मानसोपचार विभागाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. “आत्महत्येबद्दल बोलणे ही कमजोरी नसून मदतीकडे जाणारे पहिले पाऊल आहे (Suicide Prevention Day Baramati) योग्य वेळी सुरू झालेला एक संवाद एखाद्याचे जीवन वाचवू शकतो,” असा संदेश डॉ. पाटील यांनी दिला.

या उपक्रमांत आत्महत्येच्या प्रतिबंधासाठी संवाद, संवेदनशील ऐकणे आणि वेळेत मदत घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “आत्महत्येबद्दलची कथा बदलूया!” या संदेशासोबत “मौन तोडा, संवाद सुरू करा, ऐका, साथ द्या, मदतीशी जोडा” हा संदेशही देण्यात आला.

वैद्यकीय तसेच नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर, स्लोगन, निबंध व काव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आत्महत्येची संभाव्य चेतावणीची लक्षणे, जोखमीची चिन्हे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. मानसोपचार विभागातील तज्ज्ञांनी आत्महत्येचे विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचे शांतपणे व संवेदनशीलतेने ऐकून घेणे, गंभीर संकेतांकडे गांभीर्याने पाहणे, वेळेत मदत घेणे आणि आवश्यकतेनुसार मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधणे याबाबत मार्गदर्शन केले.

अधिष्ठाता अंजली पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालय व रुग्णालयात छात्र मानस कक्ष कार्यरत असल्याची माहिती दिली. तसेच शैक्षणिक किंवा वैयक्तिक ताणतणावाचा सामना करताना समस्या मनात न ठेवता योग्य वेळी मार्गदर्शन व मानसिक आरोग्यविषयक मदत घेण्याचे आवाहन केले.

Suicide Prevention Day Baramati यावेळी मानसोपचार प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. आदिती सातव व डॉ. रती तारापूर यांचा डॉ. अंजली पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. विवेक सहस्रबुद्धे यांच्यासह मानसोपचार विभागातील डॉक्टर, वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थी तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×