Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Sunil Jagtap Pune Teachers Constituency : शिक्षकांचे प्रश्न तत्परतेने सोडविणारे कार्यकर्ते : सुनील जगताप

Sunil Jagtap Pune Teachers Constituency

पुणे शिक्षक मतदारसंघातून सुनील जगताप अपक्ष उमेदवार; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न

marathinews24.com

पुणे – Sunil Jagtap Pune Teachers Constituency : पुणे शिक्षक मतदार संघातून एकूण 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात सुनील जगताप हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या आंदोलनात सुनील जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पाचही जिल्ह्यांमध्ये विविध शाळा महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम सुनील जगताप करत असून त्यांना शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाकालीच्या उग्र रूपाने पुणे लोकमान्य फेस्टिवलमध्ये रंगली तांडव नृत्याची भव्य प्रस्तुती – सविस्तर बातमी 

पुणे शिक्षक मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक काळ शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणारे शिक्षकांचे कार्यकर्ते म्हणून सुनील जगताप यांची ठसठशीत ओळख आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

शिक्षकांच्या आलेल्या एका फोनवर शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्यमिक,प्राथमिक या ठिकाणी जाऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे महत्त्वपूर्ण काम जगताप यांनी केले आहे. (Sunil Jagtap Pune Teachers Constituency) शिक्षकांना दिली जाणारी शालाबाह्य कामे, संच मान्यता,जूनी पेन्शन योजना यामुळे निर्माण झालेले प्रश्न, शिक्षकांवर लादलेली टीइटी परीक्षा,अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुनील जगताप हे शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×