Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

स्वारगेट मेट्रो स्टेशनला लागली गळती

स्वारगेट मेट्रो स्टेशनला लागली गळती

कोट्यवधींच्या प्रकल्प गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

marathinews24.com

पुणे – मुसळधार पावसाचा फटका मेट्रो प्रकल्पालाही बसल्याचे दिसून आले आहे. सध्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या स्वारगेट मेट्रों स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे मेट्रो स्टेशन उभारल्याचा दावा केला जात असताना, पावसाच्या पाण्यामुळे गळती झाल्याने प्रकल्पाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था; दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा – सविस्तर बातमी 

स्वारगेट हे पुणे मेट्रोचे महत्त्वाचे स्थानक मानले जाते. भविष्यात हजारो प्रवाशांची ये-जा या स्थानकातून होणार असल्याने या प्रकल्पाकडे विशेष लक्ष आहे. मात्र, स्टेशनचे काम अद्याप सुरू असतानाच पावसाचे पाणी आत झिरपत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अशा प्रकारची गळती होणे गंभीर बाब मानली जात आहे. पावसाचे पाणी रोखण्यासाठी आवश्यक जलरोधक व्यवस्था, बांधकामाची गुणवत्ता आणि तांत्रिक तपासणी याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जर बांधकामाच्या टप्प्यातच अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि स्टेशनच्या देखभालीबर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यनू केली जात आहे.

मेट्रो हा शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रकल्प मानला जातो. त्यामुळे प्रकल्पाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. स्वारगेट मेट्रो स्टेशनवरील गळतीची घटना ही केवळ तांत्रिक त्रुटी आहे की बांधकामातील गंभीर दोष, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महा मेट्रोच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

स्वारगेट मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी गळू लागल्याच्या घटनेनंतर समाज माध्यमावर महामेट्रोवर टीकेची झोड उठली आहे. इतक्या भव्य आणि कोट्यवधींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात वॉटरप्रूफिंगची कामे दर्जेदार पद्धतीने का करण्यात आली नाहीत, असा प्रश्न अनेक पुणेकर उपस्थित करत आहेत. स्थानकात पाणी गळत असताना ठेवलेल्या बादल्यांचे छायाचित्र आणि चित्रफीत समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, नेटिझन्सनी महामेट्रोच्या कारभारावर उपरोधिक प्रतिक्रिया देत खिल्ली उडवली आहे.

स्वारगेट मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाप्याची गळती झाल्याची घटना निदर्शनास आली आहे. याची तात्काळ दखल घेत महा मेट्रोच्या देखभा आणि तांत्रिक पथकाने काम सुरू केले असून गळतीचे नेमके कारण शोधले जात आहे. सध्या स्वारगेट मेट्रो स्टेशनचे बांधकाम प्रगतीपथावर असून बांधकामाच्या टप्प्यात अशा प्रकारच्या तांत्रिक त्रुटी किंवा उणिवा आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे.

चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी पुणे मेट्रो

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×