Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

तडीपाराला गुंडाला पाठलाग करून पकडले

तडीपार गुंडाला पाठलाग करत पोलिसांनी पकडले

Marathinews24.com

पुणे- पोलिस आल्याची चाहुल लागताच पळून जाणार्‍या तडीपार गुंडाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याला बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. संघर्ष नितीन अडसूळ (वय २२ रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खंडणी एकचे गुन्हे शाखा पोलिस अधिकारी व अंमलदार गस्त घालत होते.

पोलीस अंमलदार मयूर भोकरे व पोलीस हवलदार रणजीत फडतरे यांना तडीपारीतील आरोपी शहरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा शोध घेत असताना तो पोलिसांना पाहुन पळून जात होता. त्यावेळी त्याला दोघांनी पकडून चौकशी केली असता, तो बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला संबंधित पोलिसांच्या स्वाधीन केली. ही कारवाई खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×