Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

तडीपाराने काढला कोयता, भीतीने नागरिक सैरावैरा पळाले

तडीपाराने काढला कोयता, भीतीने नागरिक सैरावैरा पळाले

कॅम्प परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – तडीपार असतानाही शहरात येउन कोयत्याच्या धाकाने सराईताने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना १ जूनला रात्री दहाच्या सुमारास कॅम्पमधील भोपळे चौकाजवळ घडली आहे. आरोपीने कोयता दाखविताच परिसरातील नागरिक सैरावैरा पळत असल्याचे दिसून आले. त्यासोबतच व्यावसायिकांनी दुकाने बंद केल्यामुळे संबंधिताची दहशत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मलंग मेमन (वय २९ रा. भिमपुरा, कॅम्प) असे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. याप्रकरणी महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीएमपीएल बसच्या धडकेत पादचारी ठार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला १ जूनला रात्री दहाच्या सुमारास भोपळे चौकातून दुचाकीवर प्रवास करीत होती. त्यावेळी आरोपी पायी जात असताना त्याचा तोल जाउन महिलेच्या दुचाकीचा आधार घेउन थांबला. त्यानंतर त्याने महिलेला शिवीगाळ करीत त्यांना गाडी हळू चालव असे म्हटले. शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे आरोपी मलंगने कंबरेला असलेला कोयता बाहेर काढला. मला तू बोलते काय, थांब तुझ्याकडे आज बघतोच, आज तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्याने धमकाविले. त्यामुळे कोयत्याला पाहून आजूबाजूचे लोक सैरावैरा पळू लागले. काही दुकानदारांनी शटर बंद केल्याचेही तक्रारीत नमूदकेले आहे.

संबंधित आरोपी मलंग हा सराईत असून, त्याला पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. मात्र, त्यानंतरही तो शहरात मिळून आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बनसोडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×