Breking News
हिंदुस्थानची जीवनशैली पर्यावरण पूरक- माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकरकुख्यात गुंड शाहरुख ऊर्फ हट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर; सराईत टिपू पठाण टोळीत होता कार्यरतसंतांच्या पालखी सोहळ्यांना आधुनिकेचा साज…नीट २०२५ निकाल जाहीर; राजस्थानचा महेश देशात प्रथम, महाराष्ट्राचा कृषांग तिसराआषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारीशालेय साहित्य खरेदी आणि चतुर्थीनिमित्त गर्दीलूटमार करणारा सराइत गजाआड..विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे सर्वतोपरी सहकार्य-दादाजी भुसेशिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हेशिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

पीएमपीएल बसच्या धडकेत पादचारी ठार

accident death

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव पीएमपीएल चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १ जूनला रात्री आठच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील इन गेटजवळ घडली आहे. याप्रकरणी बस चालकाविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतवारी सुमेरसिंह तेकाम (वय ४७ रा. बालाघाट मध्यप्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार सुनील मोरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

गॅस रिफिलिंग करताना झाला स्फोट, दोघे कामगार भाजले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी तेकाम हे मूळचे मध्यप्रदेशातील असून, १ जूनला रात्री आठच्या सुमारास पुणे स्टेशनजवळील इनगेटजवळून पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएल बसचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या तेकामचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पीएमपीएल बस चालकाचा शोध घेण्यास प्राधान्य दिले होते.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top