Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोंढव्यात शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

सोलापूर रस्त्यावर पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार शिक्षिकेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार शिक्षिका कोंढवा बुद्रुक भागात राहायला आहेत.

तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार शिक्षिका गुरुवारी (११ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास शिकवणी वर्गातून घरी निघाल्या होत्या. काकडे वस्ती परिसरात दुचाकीस्वार शिक्षिकेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. शिक्षिकेेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या चोरट्यंचा माग काढण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात पादचारी महिलांकडील दागिने, तसेच नागरिकांना धमकावून मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×