Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

खेळात प्राविण्यासाठी संघभावना महत्वाची-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

marathinews24.com

बारामती – कुठल्याही खेळात यश संपादन करण्यासोबतच उच्च पातळीवर जाण्यासाठी ध्येय निश्चित करणे, सतत सराव करणे, कठोर परिश्रम घेणे आणि संघभावना जपणे अत्यावश्यक आहे. पराभवानंतरही हार न मानता पुढील वाटचाल करण्याची वृत्तीच खेळाडूला यशाच्या उंचीवर नेते, असे प्रतिपादन बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी सामंजस्य करार – सविस्तर बातमी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, व जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने 20 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, छत्रपती पुरस्कार विजेती रेखा धनगड, प्रो-कबड्डी खेळाडू दादा आव्हाड, कराटे असोसिएशनचे सचिव संदीप गाडे, तसेच संदीप वाघचौरे, रवी सूर्यवंशी उपस्थित होते.

लकडे म्हणाले, खेळाडूनी संघभावनेने खेळ खेळले पाहिजे, विजेत्या खेळाडूंनी आपल्या आयुष्यात उंचशिखरावर जाण्याकरिता अधिकची मेहनत घ्यावी, ग्रामीण भागात स्पर्धा होत असल्याने येथील खेळाडूंनाही हे खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील आठही विभागांतून एकूण 650 खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उद्धाटन समारंभात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते प्रथमेश कोळपे (कुस्ती) व राष्ट्रीय कराटे खेळाडू श्रुतिका कराळे, कृतिका शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र खोमणे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×