Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुणे पोलिसांच्या घरांसाठी आता टेक्नोसॅव्हीचा वापर

क्यआर कोड स्कॅन करा, आपले घर निवडा

marathinews24.com

पुणे – नागरिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र राबणार्‍या अमलदारांसह पोलीस निरीक्षकांच्या वास्तव्यासाठी प्रशासनाने टेक्नोसॅव्ही पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गुगलशीट आधारित अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून, क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर घरांसाठी फॉर्म भरता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रशासनाने मानवी हस्तक्षेप टाळण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे घरांसाठी कारकुनासह पोलीस ठाणे स्तरावरील वशिलेबाजीला लगाम लागणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अ‍ॅप्लिकेशन काही दिवसांतच सुरू होणार आहे.

वनहक्क व पेसा कायद्यानुसार गौण वनोपज वाहतूक परवाना अधिकार ग्रामसभांकडे – सविस्तर बातमी 

पोलीस ठाण्याजवळ वास्तव्याला घर मिळावे, यासाठी अमलदारांसह अधिकार्‍यांचा अट्टाहास असतो. मात्र, अनेकवेळा पोलीस लाईनमधील घरांच्या संख्येपेक्षा कित्येक पटीने अर्ज प्रशासनाकडे प्राप्त होत होते. त्यामुळे पसंतीक्रम ठरविताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर तयार होत होता. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आता गुगलशीट अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. त्यानुसार कोणत्याही कर्मचारी-अधिकार्‍यांना ऑनलाईनरित्या तत्काळ अर्ज कराता येणार आहे. संबंधित अ‍ॅपचा क्यूआर कोड तयार केला असून, मंगळवारपासून (दि. २) प्रत्येक पोलीस ठाण्यात क्यूआर पाठविला जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना आपल्या मोबाइलद्वारे थेट कोड स्कॅन केल्यानंतर अर्ज मिळवून ऑनलाईनरित्या अपलोड करता येणार आहे.

वयोवृद्ध आई-वडिलांसह कौटुंबिक आजारपणाला प्राधान्य

ऑनलाइन फॉर्ममध्ये घर मिळवण्यासाठी माहिती अपलोड करावी लागणार आहे. विशेषतः पोलीस लाईन निवड केल्यानंतर, ड्युटीला असलेले पोलीस ठाणे, घर बदलायचे असल्यास ठोस कारण, इमारतीच्या तळमजल्यावर राहायचे असल्यास आजारपणाचे प्रमाणपत्र, स्वतःकडे आई-वडील राहत असल्याचे घोषणापत्र, पत्नी, मुले, स्वतःसह आई-वडिलांचे आजारपण असल्याची ठोस कागदपत्रे, डॉक्टरांचे प्रमाणपत्र ऑनलाईनरित्या अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तीन जणांच्या कमिटीकडून अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार प्राधान्य क्रमाला महत्व देउन संबंधितांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

वशिलेबाजीला लगाम, कारकुनांचा हस्तक्षेप टळणार

पोलीस ठाण्यातंर्गत लावलेला क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर अमलारांसह पोलीस निरीक्षकांना मोबाइलवर घरांचा अर्ज मिळणार आहे. त्यामध्ये माहिती अपलोड करून काही कागदपत्रे, प्रमाणपत्रेही ऑनलाईनरित्या जोडावी लागणार आहेत. त्यामुळे पसंती आणि प्राधान्य क्रमांत कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. विशेषतः घरे मिळवण्यासाठी पोलीस लाईनपासून ते तळमजल्यावरील घरांसाठी काही कारकुनांकडून होणारी हेराफेरी आणि हस्तक्षेप टळणार आहे. त्यामुळे अर्जदारांना फायदा होणार आहे.

पोलिसांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी गुगलशीट बेस अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. त्याद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून अर्ज करता येणार आहे. त्यानुसार पसंती आणि प्राधान्य क्रमानुसार अर्जदारांना घरे दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत हे अ‍ॅप्लिकेशन फायदेशीर ठरणार आहे. – संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×