Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

डोक्याला पिस्तूल लावून बिल्डरकडून १० फ्लॅट बळकावले

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

घायवळ टोळीचा आणखी कारनामा उघडकीस; गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीचा आणखी एक कारनामा उघडकीस झाला आहे. त्याने बिल्डरच्या डोक्याला पिस्तूल लाउन धमकावून थेट १० फ्लॅट बळकावल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधितांविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळकावलेल्या फ्लॅटची किंंमत कोट्यावधी रूपये असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आतापर्यंत मागील काही दिवसांत त्याच्याविरुद्ध दाखल झालेला पाचवा गुन्हा आहे.

संप कालावधीत महावितरणकडून राज्यातील वीजपुरवठा सुरळीत – सविस्तर बातमी 

निलेश गायवळ, सचिन गायवळ, बापु कदम, चिक्या ऊर्फ ओंकार फाटक, मनिष माथवड, सागर चौधरी, माऊली तोंडे, निलेश शर्मा यांच्यासह पाच ते सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमधील बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली आहे. ही घटना जुन २०१८ ते मे २०२५ कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून, कोथरूडमध्ये त्यांची साईट सुरू होती. बांधकाम पुर्ण झाल्यानंतर कुख्यात नीलेश घायवळसह त्याचा भाउ सचिन घायवळ आणि टोळीने बिल्डरला गाठले. त्यांच्या इमारतीमध्ये बेकायदेशीर प्रवेश करुन गैरकायदयाची मंडळी जमवली. त्यानंतर गुंड निलेश गायवळ याने बिल्डरच्या डोक्याला पिस्तुल लाउन इमारतीमधील १० फ्लॅटवर बेकायदेशीरपणे खंडणीच्या स्वरुपात ताबा घेतला. त्यानंतर टोळीने संबंधित फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेउन त्यांच्याकडून आरोपी बापु कदम हा बेकायदेशीरपणे भाडे वसूल करीत होता. भाडे अनाधिकाराने घेवुन निलेश गायवळ याला दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुंड सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिला नाही- पोलीस आयुक्त

आरोपी सचिन घायवळ याच्याविरूद्ध विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर सचिनने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडे अपील केले होते. त्यानुसार अपीलावर सुनावणी घेताना त्याला शस्त्र परवाना देण्याचे आदेश कदम यांनी २० जून २०२५ रोजी पुणे पोलिसांना दिले होते. मात्र, याबाबत आतापर्यंत आम्ही सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिला नाही. त्याच्याविरूद्ध अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे अद्यापर्यंत त्याला शस्त्र परवाना दिला नसल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×