Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240 व्या आराधना महोत्सवाला सुरुवात

श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240 व्या आराधना महोत्सवाला सुरुवात

भक्तीरसपूर्ण वातावरणात धार्मिक विधींचे आयोजन

marathinews24.com

पुणे – जगत्‌‍गुरू श्रीमान मध्वाचार्य मूळ महासंस्थानतर्फे श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240व्या आराधना महोत्सवाला सोमवारी (दि.३०) भक्तीरसपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. महोत्सवानिमित्त श्री राघवेंद्र स्वामी महासंस्थानचे मंत्रायल (आंध्रप्रदेश) पिठाधीश्वर श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांचे आगमन झाले आहे. आराधना महोत्सवानिमित्त मठाच्या आवारातील श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या समाधीस विशेष महापूजेने पुष्पालंकारित करण्यात आले आहे.

श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240 व्या आराधना महोत्सवाला सुरुवात

स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला – सविस्तर बातमी 

सदाशिव पेठेतील लक्ष्मी रोडवरील नंजनगूडु श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे या तीन दिवसीय आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आराधना महोत्सवानिमित्त रविवारी सायंकाळी ध्वजारोहण, प्रार्थनाउत्सव, गौपूजा आणि धनधान्य पूजा करण्यात आली. तर आज (दि. 30) पहाटे साडेपाच पासून सुप्रभात, निर्माल्यसेवा, पंचामृतपूजा, अलंकारपूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आराधना महोत्सवाला सुरुवात झाली.

आराधना महोत्सवास पुण्यासह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पिठाधीश्वर श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांची पाद्यपूजा करण्यात आली तसेच तप्त मुद्रा धारण सोहळा झाला. श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांच्या हस्ते सभामंडपात श्री मूलरामाची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. सायंकाळी कुमारी अभिज्ञा रघुनंदन यांनी दासवाणी सेवा रुजू केली.

मठाच्या आवारात रजत रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 1 आणि दि. 2 जुलै रोजीही सकाळी 5:30 ते सायंकाळी 8 या वेळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 जुलै रोजी पंडित रघुनंदन पणशीकर यांचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायन आणि दि. 2 जुलै रोजी कृती नरसिंम्हाचार कुर्डी दासवाणी सादर करून आपली सेवा रुजू करणार आहेत. हे सांस्कृतिक सायंकाळी 6 ते 7 या वेळात होणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×