Breking News
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनॉर्वे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टमंडळात ‘ग्रीनएक्स’च्या आरती भोसले-अहिवळे यांची निवडआरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बीएआय-आरएमसी यांच्यात संयुक्त बैठकपुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्नमुंढव्यातील तो खून नव्‍हे अपघातबनावट सोने तारण ठेवून बँकेची ४ कोटींची फसवणूककाेथरूड भागात तरुणावर शस्त्राने वारमतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूकनीट २०२६ पेपरफुटी प्रकरणी पुण्यात संताप; छावा संघटनेचे आंदोलन

अत्याचार झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

अत्याचार झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

केज तालुक्यात घडली होती घटना

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – दोन दिवसांपूर्वी चुलत्याने बळजबरी करत केलेल्या अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा अखेर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला असून खळबळ उडाली आहे. नराधम चुलत्याच्या कृत्यामुळे परिसरात गंभीर वातावरण निर्माण होऊन संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपी नराधमाला ताब्यात घेतले आहे.

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घराच्या पाठीमागील गोठ्यातून घरी जात असताना आरोपी असलेल्या चुलत्याने तिला अडवले. त्यानंतर तिला जबरदस्तीने तिच्यावर अनैतिक अत्याचार केला. घटनेनंतर जर कोणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी आरोपी व त्याच्या पत्नीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

बीडच्या केज तालुक्यातील पोलिस स्टेशन हद्दीतील गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरी करत तिच्याच चुलत चुलत्याने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली घटना होती. या घटनेने काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चुलत्याने केलेल्या अमानुष अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. अल्पवयीन पीडीतेने अत्याचारानंतर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते.

तिला तातडीने उपचार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले होते. तिची सातत्याने खालावत होती. तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली. घटनेने केजसह संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून गावात शोककळा पसरली आहे. नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीड येथील पिंक पथक करत आहे .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×