Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

नसरापुरात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय

चिमुकलीवरील अत्याचारानंतर हत्या प्रकरणात संताप; आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी

marathinews24.com

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुरात घडलेली चिमुकलीवरील लैंगिक अत्याचारानंतर हत्या झाल्याची घटना संतापजनक असून, या घटनेवर शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली.

पुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात – सविस्तर बातमी

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच दोष सिद्धीचे प्रमाण (कन्विक्शन रेट) वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी गाव पातळीवर महिला दक्षता समित्या आणि महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यावर त्यांनी भर दिला. “गावागावांत लोक सहभागातून सुरक्षा यंत्रणा उभी राहिली पाहिजे. प्रत्येक गावात ‘बिट मार्शल’ असावा, जेणेकरून संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांपर्यंत पोहोचेल असे त्यांनी नमूद केले.

वारंवार गुन्हे करणाऱ्या ‘हॅबिच्युअल ऑफेंडर्स’वर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रमाचा उल्लेख करत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांच्या सुरक्षेसाठी उपसभापती कार्यालयातून आम्ही ‘सेफ्टी ऑडिट’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील एसटी बस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, तसेच रेल्वे स्थानके आणि प्रवासी थांबे येथे सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात यावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.”

घटनेनंतर नागरिकांनी व्यक्त केलेला संताप स्वाभाविक आहे. मात्र आंदोलन करताना कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने भूमिका मांडावी. पीडित कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे आहोत,” असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. याप्रकरणात आरोपीला कठोर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×