Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

कत्तलखाना विरोधातील आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता

११ वर्षांनंतर न्याय

marathinews24.com

पिंपरी – पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाखालील कत्तलखाना बंद व्हावा, तसेच महापालिकेने कत्तलखान्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध करून देऊ नये, या मागणीसाठी २०११-१२ मध्ये स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले होते. पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सु.भा.शेलार यांनी सर्व ११ आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरात मद्यपी टोळक्याचा गोंधळ – सविस्तर बातमी

२०११ – १२ मध्ये पिंपरीत कत्तलखान्याच्या प्रस्तावाने परिसरातील पर्यावरण, आरोग्य आणि धार्मिक भावनांना धक्का बसणार असल्याचे कारण देत हजारो नागरिक, व्यावसायिक व हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरले होते. शांततापूर्ण आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी जमावबंदी, दंगल भडकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे असे गंभीर आरोप लावत चंद्रशेखर अहिरराव, महेश मोटवानी, राकेश आछरा, अशोक रांका, तुषार रांका, कपिल रांका, रश्मी रांका, शिल्पा रांका, कविता सोनिगरा, गायत्री चितळे आणि हिरल चितळे या ११ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. यामुळे हे ११ जण १४ वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. परंतु पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ल शेलार यांनी पुरावे तपासून सर्व आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.

या पार्श्वभूमीवर पिंपरीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने सर्व आंदोलनकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वाघेरे म्हणाले की, “हा सत्याचा विजय आहे. आंदोलनकर्त्यांनी आपली हिंदू संस्कृती व पर्यावरण रक्षण करण्यासाठी लढा दिला होता. त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,”. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा आचरा, नरेश पंजाबी, राकेश मोरे, लक्षू बुलाणी, विजय चितळे विजय चितळे गणेश वाळुंजकर आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×