न्यायालयाने शिक्षा सुनावली अन सराईत पळून गेला

न्यायालयाने शिक्षा सुनावली अन सराईत पळून गेला

सराईताला शिवाजीनगर पोलिसांनी केले अटक

marathinews24.com

पुणे – खुनाचा प्रयत्नात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पळून गेलेल्या सराईताला पुन्हा एकदा अटक करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. संबंधित आरोपीविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यासंबंधी त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर तो पसार झाला होता. मात्र, मोटारीतून प्रवास करीत असताना त्याच्यासह साथीदाराला पोलिसांनी वाघोली परिसरातील खांदवेनगरात ताब्यात घेत अटक केली आहे. अनमोल अतुल जाधवराव (वय ३६ रा. सुरज नगर, बिल्डिंग नंबर – बी / ४, फ्लॅट नंबर १, कोथरुड डेपो समोर, पुणे असे अटक केलेल्याचे नाव आहे.

जुन्या भांडणातून दोन्ही कुटूंबियांनी केली एकमेकांना मारहाण – सविस्तर बतमी 

पोलिसावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपी अनमोल जाधवराव याच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संबंधित गुन्ह्यात न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावल्यावर आरोपी अनमोल हा १९ जुलै २०२५ रोजी शिवाजीनगर न्यायालय परिसरातून पळून गेला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अनमोल वेगवेगळी वेषभुषा करुन नाशिक, मुंबई, सातारा, सांगली, पुण्यातील पौंड, मुळशी, हवेली अशा वेगवेगळ्या भागात वावरत होता. दरम्यान, पोलीस नाईक सचिन जाधव यांना ६ ऑक्टोबरला आरोपी अनमोल हा अहिल्यानगरकडून वाघोलीच्या दिशेने मोटारीतून येत असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना माहिती देउन पथकाने वाघोलीतील खांदवेनगरात सापळा रचला. चारचाकी गाडी (नंबर एम एच ०४ ई एक्स ८२४४) चालकाला चारही बाजूने सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. दुसरा आरोपी अक्षय संजय हंपे (वय ३० रा. सौरभ नगर, भिगार, अहिल्यानगर) हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी साईनाथ ठोंबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक धनंजय पिगंळे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, दिपक चव्हाण, राजकिरण पवार, सचिन जाधव, दिपक रोमाडे, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे, इसाक पठाण, तेजस चोपडे, दिनेश भोसले यांनी केली.

क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, सीआयडी पाहून केले प्लॅन

आरोपी अनमोल जाधवराव याने क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, सीआयडी मालिका पाहून पोलिसांची तपासाची पद्धत अभ्यासली. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी कसे प्रयत्न करतात, याची माहिती मिळविली. त्यानंतर तो स्वतःचा मोबाइल न वापरता १०० ते १५० किलोमिटर अंतर बदलून रस्त्याने जाणार्‍या लोकांना माझा मोबाईल फोन हरवलेला आहे, अशी बतावणी करीत होता. त्यांचा मोबाइल घेउन कुटूंबियासह मित्रांशी संपर्क करीत होता. संपर्क झाल्याने नंतर लगेच ते ठिकाण मी बदलत असे तपासात सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×