Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

चालकाने ब्रेक मारला अन लोखंडी सळ्या गाडीच्या केबीनमध्ये शिरल्या

वाहन चालक ठार, क्लिनर जखमी, पुण्यातील चांदणी चौकात घडला अपघात

marathinews24.com

पुणे – लोखंडी पाईप वाहतूक करणार्‍या चालकाने वाहनाचा ब्रेक दाबल्यामुळे झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर क्लिनर गंभीररित्या जखमी झाला आहे. लोखंडी पाईप गाडीच्या केबीनमध्ये शिरल्यामुळे चालक गंभीर जखमी होउन त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चांदणी चौकात झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह पोलीस, अग्निशमक दलाचे जवान, बावधन नागरिक व हेल्प रायडर्सचे पराग माळी यांची मदतकार्य राबविले.

डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या वाहन चालकाचे निधन, फेसबुक पोस्ट व्हायरल – सविस्तर बातमी

चालकाने ब्रेक मारला अन लोखंडी सळ्या गाडीच्या केबीनमध्ये शिरल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवजड वाहन चालक मुंबईहून सातार्‍याच्या दिशेने मार्गस्थ होत होता. शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चांदणी चौकात संबंधित चालकाने वाहनाचा बे्रक दाबला. त्यावेळी क्षमतेपेक्षाही जास्त भरलेले लोखंडी पाईप थेट वाहन चालकाच्या केबीनमध्ये घुसले. त्यामुळे केबीन पुर्णतः उध्वस्त होउन खाली झुकली. अपघातात ट्रकचा चालक गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

तर क्लिनर गंभीररित्या जखमी झाला असून, त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कोथरूड, वारजे पोलिसांसह वाहतूक विभागातील कर्मचार्‍यांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, लोखंडी पाईपच केबीनमध्ये घुसल्यामुळे चालकाला बाहेर काढण्यात अपयश आले. मात्र, स्थानिक नागरिकांसह इतरांमुळे वाहनातील क्लिनरला बाहेर काढण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×