Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

हडपसरमध्ये कालव्यात ढकलून तरुणाचा खून

पोलिसांंना गुंगारा देणारा आरोपी अटकेत

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून हडपसरमधील कालव्यात ढकलून तरुणाचा खून केल्याप्रकरणात गेले २० महिने फरार असलेल्या आरोपीला पोलिसानी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली. वैभव मनोज जाधव (वय २४, रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसरमधील उन्नतीनगर भागातील कालव्यात ५ मे २०२४ रोजी विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा, जि. ठाणे) बेशुद्वावस्थेत पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली होती.

बिबवेवाडीत दहशत माजविणारा गजाआड – सविस्तर बातमी

जाधवला कालव्यातील पाण्यात बाहेर काढून पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी जाधवने किरकोळ वादातून शार्दुल याला कालव्यात ढकलून दिले होते, याबाबतची माहिती पोलिसांना तपासात मिळाली होती. त्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. आरोपी जाधव हा उत्तराखंडमध्ये पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. हडपसर पोलिसांचे पथक हरिद्वार येथे गेले. आरोपी एका लाॅजमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून गुरुवारी (२५ डिसेंबर) त्याला ताब्यात घेतले. जाधव खून प्रकरणात गेले २० महिने पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला अटक करण्यात आली असून, पोलिसांचे पुण्याकडे रवाना झाले आहे.

परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी दीपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापू लोणकर, विजय कानेकर, अजित मदने, भगवान हंबर्डे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×