Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बिबवेवाडीत दहशत माजविणारा गजाआड

मोबाइल चोरणार्‍या डिलीव्हरी बॉयला अटक

बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – बिबवेवाडी भागात अल्पवयीनाला जीवे मारण्याची धमकी, तसेच दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले सहा महिने फरार असलेल्या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. संदेश दिलीप सौदागर (वय २२, रा. मार्केट यार्ड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १६ जून रोजी आरोपी सौदागर आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांनी बिबवेवाडी भागात दहशत माजविली होती. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली होती.सौदागर आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांनी अल्पवयीनाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अल्पवयीनाच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कात्रज बाह्यवळण मार्गावरील लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय – सविस्तर बातमी

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सौदागर पसार झाला होता. गेले सहा महिने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. सौदागर अप्पर इंदिरनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतरबिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळआ लावून त्याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस कर्मचारी गायकवाड, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, रक्षित काळेे, सुमीत ताकपेरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×