Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कात्रज बाह्यवळण मार्गावरील लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय

पोलिसांचा छापा; देहविक्रय करणाऱ्या तरुणी ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लाॅजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. फुरसुंगी पोलिसांनी लाॅजवर छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना देहविक्रय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर, पवन सोनपारखे, तसेच बिंदा नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यत आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तेहसीन बेग यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोथरूडमध्ये घरफोडी; ६ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरातील कात्रज मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या क्रिस्टल लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत लाॅजमधून तरुणींना ताब्यात घेतले. लाॅज व्यवस्थापाकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.

शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मसाज पार्लर, लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी बाणेर भागातील लाॅजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला होता. याप्रकरणी लाॅज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी तरुणींना ताब्यात घेतले होते. बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे प्रकार सुरू आहेत.

कोरेगाव पार्कमध्ये मसाज पार्लरवर छापा

कोरेगाव पार्क भागात एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक फैजल अजिहूर रेहमान अहमद उर्फ समीर (वय ३८, रा. कोणार्क व्हयू सोसायटी, केशवननगर, मुंढवा ) याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वणवे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागातील सिल्व्हर सोल स्पामध्ये मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतले. मसाज पार्लरचा व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×