कोथरूडमध्ये घरफोडी; ६ लाखांचे दागिने लंपास

कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत

चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मद्यपी वाहन चालक, हुल्लडबाजांवर कडक कारवाईचे आदेश – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूडमधील आझादनगर भागातील सुखाई काॅम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. ५ डिसेंबर रोजी ते परगावी गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील ६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. तक्रारदार परगावाहून नुकतेच परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×