Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

टोळक्याने दोघांना मारहाण करून लुटले

पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण

काळेपडळमधील घटना

marathinews24.com

पुणे – रिक्षातून येउन दुचाकीस्वारा तरूणासह दोघांना मारहाण करीत टोळक्याने त्यांच्याकडील ऐवज चोरून नेल्याची घटना १ जूनला संध्याकाळी सातच्या सुमारास हडपसरजवळील काळेपडळ रेल्वे बोगद्यावजळ घडली आहे. याप्रकरणी दिशान रहिम शेख (वय २२ रा. काळेपडळ), चैतन्य तुलशीराम कराड (वय २१, रा. काळेपडळ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दीनेश वायदंडे (वय ४२ रा. काळेपडळ, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

उरळी देवाची परिसरात महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वायदंडे हे १ जूनला रात्री सातच्या सुमारास काळेपडळ रेल्वे बोगद्याजवळ मित्राची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी रिक्षातून आरोपी दिशान आणि चैतन्य हे त्याठिकाणी गेले. त्यांनी वायदंडे यांच्या दुचाकीसमोर रिक्षा उभी करून हाताने मारहाण केली. त्यांचा मोबाइल, २०० रूपयांची रोकड काढून घेतली. तसेच विजय उत्तम वांजाळे यांनाही मारहाण करीत त्यांच्याकडील अडीचशे रूपयांची रोकड काढून घेत आरोपी पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×