Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

उरळी देवाची परिसरात महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावले

उरळी देवाची परिसरात महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावले

चोरट्यांविरूद्ध  फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. ही घटना १ जूनला रात्री आठच्या सुमारास उरळी देवाची परिसरातील धनगरवस्ती रोड परिसरातील सातव इमारतीजवळ घडली आहे. याप्रकरणी उरळी देवाची परिसरात राहणार्‍या ५३ वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तडीपाराने काढला कोयता, भीतीने नागरिक सैरावैरा पळाले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला १ जूनला रात्री आठच्या सुमारास उरळी देवाची परिसरातील धनगरवस्ती रोड परिसरातील सातव इमारतीजवळून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे दुचाकीवर सुसाटपणे पसार झाले. याप्रकरणी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींच्या दुचाकी क्रमांकावरून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×