Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

तडीपार केल्यानंतर बिबवेवाडीत दहशत माजविणारा गुंड गजाआड

Warje Malwadi Crime News

आदेशाचा भंग करणे, दहशत माजविल्या प्रकरणी

marathinews24.com

पुणे – शहरातून तडीपार केल्यानंतर बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अविनाश उर्फ ताऊ अर्जुन जोगन (वय २८, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणे, तसेच दहशत माजविल्या प्रकरणी जोगन याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात बेशिस्त टँकरचालकांविरुद्ध कडक कारवाई – सविस्तर बातमी

गुन्हेगार जोगनला परिमंडळ दोनच्या पाेलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातून १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर तो शहरात अला होता. बिबवेवाडीतील शेळके वस्तीत कोयता उगारून त्याने दहशत माजविल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याचा शोधून घेऊन ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे, उपनिरीक्षक अमोल भुवड, संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमीत ताकपेरे, रक्षित काळे यांनी ही कारवाई केली.

शहरात दहशत माजविणाऱ्या गुंडांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तडीपार केल्यानंतर काही सराइत आदेशाचा भंग करुन शहरात वास्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे. आदेशाचा भंग करुन शहरात वावरणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तडीपार केलेला सराईत शहरात आढळून आल्यास किंवा दहशत माजविल्याचा प्रकार दिसून आल्यास त्वरीत नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×