पोलिसांच्या पथकाने सापळा लाऊन आरोपीला केली अटक
marathinews24.com
पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तसेच दोन काडतुसे जप्त करण्यात आली. इरफान रईसउद्दीन मलिक (वय ३२, रा. संकेत विहार, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी मलिक हा दादा गुजर शाळेजवळ थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अतुल पंधरकर, दाऊद सय्यद यांना मिळाली.
मालवाहू वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. मलिक याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी मलिक याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक आयुक्त अमित शेटे, उपनिरीक्षक विनायक गुरव, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहिद शेख, लक्ष्मण काळे यांनी ही कारवाई केली.






















