Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुण्यात दहीहंडीचा आनंद शिगेला…

उत्सवानिमित्त ठिकठिकाणी वाहतूकीत बदल

marathinews24.com

पुणे –  शहरात श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने विविध मंडळांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन दिवस शहरातील भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. १५ आणि १६ ऑगस्टला शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर दहीहंडी उत्सवानिमित्त वाहतूकीत बदल केला आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे रस्त्यांवर कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये, गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक बदल केला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा अर्ज – सविस्तर बातमी

बंडगार्डन वाहतुक विभाग

तीन तोफा चौक ते ब्ल्यू नाईल चौक ईस्कॉन मंदीरासमोरून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. संबंधित विभागातील वाहन चालकांनी ब्ल्यू नाईल चौक ते तीन तोफा चौकाकडे जाणारा मार्ग हा दुतर्फा वाहतुकीसाठी खुला आहे. तर कोंढवा वाहतुक विभागात गगनउन्नती चौक येथील यू टर्न बंद करण्यात येत आहे. केसर लॉज जवळील यू टर्न बंद करण्यात येत आहे. खडीमशिन पोलिस चौकी ते श्रीराम चौक या रोड वरील वाहतूक बंद आहे. वाहनांनी खडी मशिन चौकातून यू टर्न घेऊन इस्कॉन मंदिराच्या पार्किंग कडे जावे व अन्य वाहनांनी इच्छित स्थळी जावे (मंतरवाडी फाटा खडीमशिन चौक कात्रज चौक मार्गावरील जड वाहतुक आवश्यकतेनुसार बंद केला जाईल )

वानवडी वाहतुक विभाग

शिवरकर रोड वरील वाहतुक बंद करण्यात येत आहे. मार्गावरील वाहनांनी संविधान चौकातून डावीकडे वळून सनग्रेस स्कुल मार्गे साळुंखे विहार रोडने इच्छित स्थळी जावे व येणारी वाहतुक त्याच रोडने येईल. संविधान चौकाकडून उजवीकडे जाणारी वाहने ही फ्लॉवर व्हॅली लेन कडून केदारी पेट्रोल पंप पुढे इच्छित स्थळी जातील. तसेच साळुंखे विहार रोडने येणारी वाहने संविधान चौकातून डावीकडे न वळता उजवीकडे वळून फ्लॉवर व्हॅली लेन कडून केदारी पेट्रोल पंप पुढे इच्छित स्थळी जातील.

फरासखाना व विश्रामबाग वाहतुक विभाग

शिवाजी रोड वरून स्वारगेटला जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने / शास्त्री रोडने इच्छित स्थळी जावे. पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी. रोडने इच्छित स्थळी जावे. तसेच सणस पुतळा चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने -झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाईल. रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असून पर्यायी मार्गाचा वापर करावा.

सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील. शिवाजी रोडवरून जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक पवळे चौक जुनी साततोटी पोलिस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाईल. गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक हि दारुवाला पूल येथून बंद राहील. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. चालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा. सोन्यामारूती चौकातून मोती चौक व फडके हौद चौकाकडे वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. विजयमारुती चौकातून उजवीकडे वळून पासोडा विठोबा मंदिर मोतीचौक डावीकडे वळून फडके हाऊस मार्गे इच्छितस्थळी जावे.

३ हजार ५०० अमलदारांचा बंदोबस्त

दहीहंडी निमित्ताने पुणे पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १० पोलिस उपायुक्त, १६ सहायक पोलिस आयुक्त, ८० पोलिस निरीक्षक, ३५० पोलिस उपनिरीक्षक आणि ३५०० पोलिस कर्मचारी हे बंदोबस्तावर हजर राहणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×