Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा अनुभव

marathinews24.com

पुणे – आकाशात उडणारे हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिलेले असते; पण त्यात बसण्याचा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ओय फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांनी दिव्यांग मुलांसाठी असा क्षण साकारला, ज्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज खुलले. ओपन युअर आईज (ओवायई) फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सिमरन जेठवानी यांच्या पुढाकाराने व महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते, कॅप्टन नितीन वेल्डे यांच्या सहकार्याने ३५ मुलांना सहा मिनिटांची हेलिकॉप्टर सफर घडवून आणण्यात आली.

व्हॅलेंटाईन डे ला शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश; ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ थाटामाटात संपन्न – सविस्तर बातमी 

हेलिकॉप्टर जमिनीवरून अलगद वर झेपावताच मुलांनी आनंदाने हात हलवत खाली पाहिले. काहींनी पहिल्यांदाच शहराला वरून पाहत आश्चर्य व्यक्त केले, तर काहींच्या डोळ्यांत उत्साहाश्रू चमकले. ‘आज आम्हीही उडालो अन आमची स्वप्नपूर्ती झाली,’ असे एका मुलाने हसत सांगितल्यावर उपस्थितांचे मन भारावले. हेलिकॉप्टर उड्डाण करताच सहभागींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह उपस्थितांसाठीही भावूक करणारा ठरला.

डॉ. सिमरन जेठवानी म्हणाल्या, “या मुलांना फक्त एक राईड नव्हे, तर आयुष्यभर जपून ठेवतील अशी आठवण द्यायची होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचा उद्देश सफल झाला. हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर संवेदनशीलतेचा संदेश होता. आनंद वाटल्यानेच वाढतो. छोट्या कृतीतून मोठा आनंद देत समाजात समावेशकतेची भावना दृढ करणारा हा दिवस आहे. दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर संधी आणि सन्मान देणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, समाजाशी संवाद वाढतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळाव्यात हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.”

दिव्यांगांना हेलिकॉप्टर राईड घडविण्याची विनंती डॉ. जेठवानी यांनी आमच्याकडे केली. त्यानंतर सामाजिक भावनेतून आम्हीही याला प्रतिसाद दिला आणि आज ३५ मुलांना हा अविस्मरणीय आनंद देऊ शकलो, याचे समाधान वाटतेय. समाजात समावेशकतेचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संस्थांचा मानस आहे, असे नितीन गोते यांनी सांगितले.

आकाशातून जमिनीवरील नजराणा खूप सुंदर दिसत होता, झाडे, नदी, गाड्या, माणसे छोटी-छोटी दिसत होती, अशी भावना व्यक्त करीत सहभागींनी आयोजकांचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×