Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

आमदार महेश लांडगे यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी

पुणे जिल्ह्यात ६ तालुक्यांतील निवडणुकीचे काम पाहावे लागणार

marathinews24.com

पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने ‘शतप्रति:शत’’ चा नारा दिला असून, जिल्ह्यातील उत्तर भागात असलेल्या ६ तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ‘‘निवडणूक प्रमुखपदी’’ आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीसह संभाव्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ला आव्हान देण्यासाठी स्थानिक पातळीवर ‘हुकमी एक्का’ बाहेर काढला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘‘जिल्हा निवडणूक प्रमुख’’ आणि प्रभारी यांची नियुक्ती घोषीत केली.

पणत्यांचा लखलखाट व समूहगायनाने ‘वंदे मातरम्’ चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा – सविस्तर बातमी

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेमध्ये पुणे जिल्ह्याचे विभाजन दोन भागांत आहे. उत्तर पुणे जिल्हा (मावळ) आणि दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) तसेच, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र भाजपा संघटनेत जिल्हा म्हणून संबोधले जाते. प्रशासकीय संरचनेमध्ये पुणे जिल्ह्यात १४ तालुके आहेत. १४ नगरपरिषदा, २ नगरपंचायती आहेत. संघटनात्मक रचनेमध्ये पुणे उत्तर जिल्हा (मावळ) मध्ये लोणावळा, तळेगाव, चाकण, राजगुरूनगर शिरुर, आळंदी, जुन्नर अशा ७ नगरपरिषदा आहेत. मंचर आणि वडगाव या दोन नगरपंचायती आहे. तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेली या ६ पंचायत समिती आहेत.

आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेली या ६ तालुक्यांचा समावेश पुणे उत्तर जिल्हा (मावळ) आहे. तसेच, पंचायत समितीचे ७६ गण आणि जिल्हा परिषदेचे ४१ गट या जागांवर होणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे ‘‘निवडणूक प्रमुख’’ म्हणून सोपवली आहे. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबतीने आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता खेचून आणली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिपंरी चिंचवडमध्ये लांडगे यांनी २०१४ पासून राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची भूमिका घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देत निवडणूक जिंकली होती. महाविकास आघाडी सत्तेच्या काळात विरोधी पक्षात असतानाही तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांना मोठी ताकद दिली. उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी असली, तरी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून महेश लांडगे यांचा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीही निर्णायक भूमिका राहणार आहे.

दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) ची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्यावर सोपवली आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी गणेश बिडकर, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी आमदार शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी आहे. महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदांच्या नियुक्तीद्वारे संभाव्य ‘गृहकलह’ कमी करण्याचा प्रयत्न भाजपा पक्षश्रेष्ठींनी केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×