Breking News
Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेत

छायाचित्रकारामुळे देशाचा इतिहास समजला – खासदार प्रणिती शिंदे

३०० छायाचित्रे बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शित

marathinews24.com

पुणे – छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. त्यांच्यामुळे देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत असून, तो इतिहास जपण्याची मोठी जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी पदी युवराज पाटील रुजू – सविस्तर बातमी

गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हल व पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली ३०० छायाचित्रे बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शित केली आहेत.

प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी केले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या होत्या. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाल्या, सोशल मीडियामुळे वृत्तपत्रातील छायाचित्रकारांची जबाबदारी वाढली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांची सत्यता अनेकदा कमी असते. मात्र वृत्तपत्रातील छायाचित्रकारांना फोटो टिपण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. ते समाजातील भावना टिपतात. अनेक छायाचित्रे बोलकी ठरतात, हीच त्यांची खरी कला आहे. पुढील पिढी जेव्हा ही छायाचित्रे पाहील, तेव्हा तिला भविष्य आणि समाजाची दिशा समजू शकेल.

उल्हास पवार म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. हा फेस्टिव्हल आज जगभरात पोहोचला आहे. छायाचित्रांचे महत्त्व आजही तेवढेच आहे. पुणे फेस्टिव्हलने हे प्रदर्शन भरविले, हे कौतुकास्पद आहे. तर प्रा. डॉ. पराग काळकर यांनी वृत्तपत्रातील छायाचित्रकार समाजमन ओळखून त्यातील भावना लोकांपर्यंत पोहोचवतात. छायाचित्रांचे प्रदर्शन होणे गरजेचे आहे. दरम्यान, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड म्हणाले, पुणे फेस्टिव्हल यंदा ३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ आमच्या उपक्रमात सहभागी झाला असून, त्यानिमित्ताने छायाचित्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रे यामध्ये प्रदर्शित केली आहेत. पुण्यातील संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले. व्यवस्थापन सचिन आडेकर व आबा जगताप यांनी केले. हे छायाचित्र प्रदर्शन शनिवार, ३० ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी विनामूल्य आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×