Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार

विधानभवनामध्ये  विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची  बैठक संपन्न

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते  रविवार १४  डिसेंबर २०२५  या कालावधीत नागपूरमध्ये  पार पडणार  आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

“फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही; नागरिकांचा जीव वाचवणे हेच सर्वोच्च उद्दिष्ट” — डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील,संस्कृतीकार्य मंत्री आशिष शेलार, सर्वश्री आमदार सुधीर मुनगंटीवार,अनिल परब, प्रसाद लाड,भास्कर जाधव, सुनील प्रभु, जितेंद्र आव्हाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, दीपक केसरकर, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दिनांक 13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवार या सुट्टीच्या कालावधीत सभागृहाचे कामकाज होणार आहे
बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा  करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×