Breking News
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनमहापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज- डॉ. श्रीपाल सबनीसमहाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाणफर्ग्युसन रस्त्यावर पुस्तक विक्री दुकानातून रोकड चोरीलाअल्‍पवयीन गुन्‍हेगारी रोखण्यासाठी डिजीटल मोबाईल व्‍हॅन फिरणारपुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’पुणे पोलिसांकडून तेजवानीच्या घरांची झाडाझडतीपुणे पुस्तक महोत्सवाच्या मांडव उभारणीचे काम वेगातराज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाईशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय

“फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही; नागरिकांचा जीव वाचवणे हेच सर्वोच्च उद्दिष्ट” — डॉ. नीलम गोऱ्हे

“फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही; नागरिकांचा जीव वाचवणे हेच सर्वोच्च उद्दिष्ट” — डॉ. नीलम गोऱ्हे

“खाजगी बस, अवजड वाहने आणि वाहतूक शिस्तीसाठी कठोर नियम; अपघात कमी करण्याचा निर्धार”

marathinews24.com

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंजवडी परिसरातील वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांबाबत तातडीची समीक्षा करण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे आढावा बैठक घेतली.

इस्त्राईलमध्ये “नूतनीकरण बांधकाम” क्षेत्रात हजारो रोजगार संधी – सविस्तर बातमी 

या बैठकीस पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी,श्रीमती अर्चना गायकवाड, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संदेश चव्हाण, पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले आणि परिवहन विभागाचे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी श्री. युवराज पाटील हे उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत व्यक्त केले की, “फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही; नागरिकांचा जीव वाचवणे हेच सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.” वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले.

खासगी बस वाहतूक व्यवस्थेत शिस्तबद्धता

खासगी बस चालकांच्या वर्तनातील ढिसाळपणा आणि वाहतुकीत निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन खासगी बस वाहतूक व्यवस्थेसाठी प्रमाणित व स्वतंत्र कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करणे, प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करणे, चालकाचा बॅज क्रमांक स्वच्छपणे प्रदर्शित करणे आणि विद्यार्थ्यांसह कंपनी कर्मचार्‍यांना नेणाऱ्या बस चालकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणे ही महत्त्वाची पावले लागू करण्याचे सांगितले.

तसेच, मद्यधुंद चालकाविरुद्ध प्रवाशांना लगेच डिजिटल माध्यमातून तक्रार नोंदविता येईल अशी सोपी व तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अवजड वाहनांवरील नियंत्रण आणि सुरक्षा

अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची शक्यता लक्षात घेऊन सर्व डंपर, मिक्सर आणि अवजड वाहनांवर रिव्हर्स व्ह्यू कॅमेरा अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. गर्दीच्या वेळात ‘नो-एन्ट्री’ चा काटेकोरपणे अंमल होईल यासाठी नवीन वेळापत्रक तयार करून त्याचे नियमित पुनरावलोकन करण्याचे सांगितले. याशिवाय, आरएमसी प्लांट परिसरात वेग नियंत्रणासाठी गस्त वाढविणे आणि अशा वाहनांवरील नियमभंग रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले.

वाहतूक नियंत्रण, सुरक्षा मोहिमा आणि अंमलबजावणी

अपघात रोखण्यासाठी वाहतूक सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या मोहिमांना प्राधान्य देण्यात आले. नियमित ब्रेथ अॅनालायझर तपासणी, ब्लॅक स्पॉटवरील प्रकाशयोजनांची तपासणी, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंगचे दुरुस्ती काम, रात्री उशिरा आणि पहाटे विशेष ड्रंक ड्रायव्हिंग मोहिमा राबविणे, हेल्मेट सक्ती आणि लेन कटिंगवर कठोर कारवाई हे उपाय तातडीने अमलात आणण्याचे ठरले.

अल्पवयीन वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच पालकांनाही जबाबदार धरण्याचे निर्देश दिले. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील गर्दीची व अपघातग्रस्त ठिकाणे घोषित करून तेथे विशेष पथकांचे वेळोवेळी उपक्रम (ड्राइव्ह) राबविण्याचे ठरविण्यात आले.

जनजागृती आणि सार्वजनिक सहभागाचे महत्त्व

वाहतूक शिस्तीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सायकलस्वारांना रिफ्लेक्टरचा अनिवार्य वापर, आयटी कंपन्यांना ‘फ्लेक्सी टाईम’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा विचार करण्याबाबत आवाहन, तसेच रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे व्यापक वाहतूक-जागरूकता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. वाहतूक नियमभंगाची माहिती नागरिकांकडून थेट व्हॉट्सअॅपद्वारे संकलित करण्यासाठी संयुक्त मोहीम राबविणे आणि सोपी ऑनलाईन तक्रार प्रणाली तयार करून ती सर्वांसाठी उपलब्ध करणे याचाही विशेष उल्लेख केला.

अपघातग्रस्त कुटुंबीयांना भावनिक आधार

डॉ. गो-हे यांनी आपल्या कर्तव्याच्या पलिकडे जाऊन गंभीर अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना विमा दावा प्रक्रियेमधून जलद मदत मिळावी यासाठी विभागाने आवश्यक ते साहाय्य करावे, असे आवाहन केले. अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी संवेदनशील भूमिका घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सुरक्षित वाहतुकीसाठी सामूहिक प्रयत्नांचा आग्रह

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या वाहतूक समस्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी नागरिक, पोलीस, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गो-हे यांनी स्पष्ट केले. सर्व निर्देशांची तत्काळ अंमलबजावणी करून तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×