शिवाजीनगरमध्ये मेडीकल दुकानात चोरी

कोंढव्यात दूरसंचार विभागाची केबल चोरी

शिवाजीनगरमध्ये मेडीकल दुकानात चोरी

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती शिवाजीनगर परिसरातील बालगंधर्व चौकात असलेल्या मेडीकलचे शटर उचकटून चोरट्यांनी ३२ हजारांची रोकड, मोबाइल असा ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १६ डिसेंबरला पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दोन अनोखळी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

चंदननगरमध्ये तरूणावर वार करणार्‍याला बेड्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिवाजीनगर परिसरात राहायला असून, बालगंधर्व चौकात त्यांचे मेडीकल आहे. १६ डिसेंबरला पहाटे पावणेतीनच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या मेडीकलचे शटर उचकटले. गल्ल्यातील ३२ हजारांची रोकड, मोबाइल असा ऐवज चोरून नेला. दुसर्‍या दिवशी तक्रारदार मेडीकल उघडण्यासाठी गेले असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करीत आहेत.

पाषाणमध्ये घरातून ३ लॅपटॉप चोरीला

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६२ हजार रूपयांचे तीन लॅपटॉप चोरून नेले आहेत. ही घटना १३ ते १५ डिसेंबर कालावधीत पाषाण-सुस रस्त्यावरील वरदायिनी सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रायकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×