वानवडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – हवाई दलातून निवृत्त झालेल्या विंग कमांडरच्या घरात चोरी करणाऱ्या मोलकरणीला वानवडी पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. तिच्याकडून चोरी करण्यात आलेल्या ५ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरी केली. सुधा राजेश चौगुले (वय ३५, रा. बोराटे वस्ती, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून चोरी केलेला ऐवज जप्त केला आहे. याबाबत सतिश द्वारकादेश मकाशीर ( वय ७८, क्रेस्ता सोसायटी, सोपानबाग, घोरपडी) यांनी तक्रार दिली आहे.
गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शन सहलीचे आयोजन – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश मकाशीर हे हवाई दलातून विंग कमांडर पदावरून निवृत्त झाले आहेत. ते पत्नीसह घोरपडीतील सोपानबाग परिसरातील क्रेस्ता सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्याकडे आरोपी सुधा चौगुले घरकाम करत होती. त्यावेळी तिने ५ लाख ८७ हजारांचे सोन्याचे दागिने आणि हिर्याचे दागिने असा ऐवज चोरी करून नेला. २१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान चोरीची घटना घडली होती.
चोरीच्या घटनेत पोलिसांनी सुरूवातीला अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. तांत्रिक तपासात चोरी घरकाम करणाऱ्या सुधाने केल्याचा संशय बळावला. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून सर्व ऐवज जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक राजकुमार डोके, सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, अमंलदार महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाने, अमोल गायकवाड, अभी चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.























