Breking News
पुण्यात गांजा तस्करीसाठी कारचा वापर, दोघांना अटकपुण्यात भाजप, काँग्रेसचे कार्यकर्त्यामध्ये तुंबळ हाणामारी; दगडफेक, पत्रकारांसह कार्यकर्तेही जखमीसौर ऊर्जा राज्याच्या आर्थिक प्रगतीची चावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसहिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेत बंजारा समाजाची बैठकबुलेटराजा कारवाईच्या तडाख्यातकाय सांगता…अवघ्या १८ दिवसांत घटस्फोट मंजूरपुण्यात बसमध्ये महिलांचे दागिने चोरणारे सराईत अटकेतशिवाजीनगर भागात ज्येष्ठाला धमकावून लुटलेमहापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला‘हिंद-दी-चादर’ च्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य शिबीराचा हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

बनावट चावीने फ्लॅट उघडून केली चोरी

बिबवेवाडीत फ्लॅटचे कुलूप तोडून साडेदहा लाखांचा ऐवज चोरी

३ लाख १४ हजारांचा ऐवज चोरीला

marathinews24.com

पुणे – बनावट चावीने फ्लॅट उघडून चोरट्यांनी २ लाख रूपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख १४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २२ मे रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील आशरफी मस्जिल इमारतीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात पादचारी ज्येष्ठांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील आशरफी मस्जिल इमारतीत राहायला आहे. २२ मे रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास महिला कामानिमित्त बाहेर गेली होती. त्याचवेळी चोरट्यांनी बनावट चावीने तक्रारदार महिलेचा फ्लॅट उघडून आतप्रवेश केला. घरातील दोन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. महिला बाहेरून आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×