Breking News
नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटकसंजय दराडे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्तयुट्यूब पाहून बनवला बॉम्ब; आरोपीला नागपूरमधून अटकपुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारपुणे जिल्हा नियोजन बैठकीत अवकाळी पाऊस, वाहतूक कोंडीची चर्चाखरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई कराशिवसेना पुणे जिल्हाप्रमुखपदी रामदास धनवटे यांची नियुक्तीकिल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावणार्‍या चोरट्यांना अटक

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावणार्‍या चोरट्यांना अटक

पर्वती पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पायी चालणार्‍या महिलेच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावून नेणार्‍या दुचाकीस्वार चोरट्यांना पर्वती पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, दुचाकी असा १ लाख ११ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. रोहन प्रभू तुपारे (वय २० रा. त्रिमुर्ती नगर, नविन पदमवातीनगर, अपर बिबवेवाडी ) आणि केशव ईश्वर कुंभार (वय १८ रा. खोपडे नगर चक्की कारखाना, महांगडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सोशल मीडियावर झालेली ओळख महागात, तरूणीवर लैंगिक अत्याचार – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला १५ ऑगस्टला तुळशीबागवाले कॉलनी परिसरातून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन नेले होते. याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून तपास केला जात होता. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित चिव्हे यांना चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने दोघांना अटक केली.

चोरट्यांच्या ताब्यातुन ५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, दुचाकी असा १ लाख ११ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, एसीपी अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित चिव्हे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, नानासो खाडे, मनोज बनसोड, सद्दाम शेख, यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×