Breking News
हिंदुस्थानची जीवनशैली पर्यावरण पूरक- माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकरकुख्यात गुंड शाहरुख ऊर्फ हट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर; सराईत टिपू पठाण टोळीत होता कार्यरतसंतांच्या पालखी सोहळ्यांना आधुनिकेचा साज…नीट २०२५ निकाल जाहीर; राजस्थानचा महेश देशात प्रथम, महाराष्ट्राचा कृषांग तिसराआषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारीशालेय साहित्य खरेदी आणि चतुर्थीनिमित्त गर्दीलूटमार करणारा सराइत गजाआड..विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे सर्वतोपरी सहकार्य-दादाजी भुसेशिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हेशिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील तीन वाहतूक अमलदारांचे तडकाफडकी निलंबन

पुण्यातील तीन वाहतूक अमलदारांचे तडकाफडकी निलंबन

चौक सोडून घोळक्याने कारवाई केल्याचा ठपका

marathinews24.com

पुणे-शहरातील वाहतूक नियमनासाठी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्या चौकात कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले. निलंबित केलेले तीन पोलीस कर्मचारी खडक वाहतूक विभागातील आहेत. पोलीस हवालदार संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार, मोनिका प्रविण करंजकर अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

सर्व शासकीय कार्यालयत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

वाहतूक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला हद्दीतील चौक आणि प्रमुख रस्त्यावर नेमणूक केली जाते. चौकातील वाहतूक नियमन ही कर्मचाऱ्याची जबाबदारी असते. मात्र, अनेक कर्मचारी त्यांना नेमून दिलेले चौक सोडून इतरत्र उभे राहतात. गाड्या अडवून त्यांच्याकडे वाहन परवाना , तसेच गाडीची कागदपत्रे मागून कारवाई केली जाते. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी घोळक्याने एका ठिकाणी थांबून कारवाई करतात. खडक वाहतूक विभागातील हवालदार यादव यांची १५ मे रोजी टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौक, पवार यांची हिराबाग चौक, तसेच करंजकर यांची भावे चौकात नेमणूक केली होती.

प्रत्यक्षात यादव, पवार आणि करंजकरे हे नेमणूक केलेले चौक सोडून पूरम चाैकात आले. त्यांनी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली. तिघे कर्मचारी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच चौकात वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे आढळले. त्यानंतर वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top